भारतीय संघाचा पराक्रम; टी–२० विश्वचषक जिंकला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | क्रीडा प्रतिनिधीआयसीसी टी–२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात प्रभावी खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व गाजवले.प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत २५५ धावा करत न्यूझीलंडसमोर प्रचंड आव्हान उभे केले. भारतीय संघासाठी संजू सॅमसन याने आक्रमक फलंदाजी करत ४६ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली, तर ईशान किशन याने २५ चेंडूत ५४ धावा करत संघाच्या धावसंख्येला वेग दिला.मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अचूक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना अडचणीत टाकत ४ महत्त्वाचे बळी घेतले. तसेच अक्षर पटेल यानेही प्रभावी गोलंदाजी करत ३ विकेट घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १९ षटकांत १५९ धावांवर बाद झाला आणि भारताने दिमाखात विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असून क्रिकेट चाहत्यांकडून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



