महाराष्ट्रविदर्भ

जळगाव जामोद पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिला म्हणून सौ अलका चव्हाण यांचा सन्मान.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

जळगाव (जा) : आज दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव जामोद पंचायत समिती यांच्यातर्फे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यासाठी क्रीडा, साहित्य शिक्षण अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली व आज महिला दिनाच्या औचित्य साधून त्यांचा सन्मान सोहळा पार पाडला.
यात गेल्या दोन वर्षापासून कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल यांना क्रीडा क्षेत्रातील कर्तुत्ववान महिला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या अशाप्रकारे खूप आनंदात व उत्साहात हा जागतिक महिला दिन जळगाव जामोद पंचायत समिती तर्फे साजरा करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button