बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जागतिक महिला दिन हा स्त्रीच्या सामर्थ्याचा स्वाभिमानाचा आणि समानतेच्या लढ्याचा गौरव करण्याचा दिवस!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर
रतन भगत.
जागतिक महिला दिन हा स्त्रीच्या सामर्थ्याचा स्वाभिमानाचा आणि समाजाच्या लढ्याचा गौरव करण्याचा दिवस आहे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाने नवे इतिहास घडवले आहे शिक्षण प्रशासन विज्ञान कला राजकारण आणि सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडत महिलांना शिक्षण हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याची प्रेरणा दिली त्यांच्या या विचारांमुळे महिलांच्या हक्कांसाठी मजबूत कायदे आणि सामाजिक जागृती निर्माण झाली या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी स्त्रियांच्या समानतेचा सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा संकल्प करूया शिक्षण स्वातंत्र्य आणि संधी यामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक महिलेला प्रगतीची समान संधी मिळावी यासाठी कोणते भेदभाव न करता स्त्री-पुरुष पारलिंगी या सर्वांसोबत समान पातळीवर वर्तन आणि व्यवहार करावा असा आग्रह धरूया स्त्री मुक्ती म्हणजेच समाजाची खरी प्रगती आहे त्यामुळे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....



