जळगावा जिल्हामहाराष्ट्र

घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; ५० पाईप टाकून १५० चे बिल उचलले! संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण”

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी श्री. अजितकुमार भीमराव महाले आणि श्री. आबा छबुलाल जाणे यांनी आज, २४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जळगाव समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.ग्रामपंचायतीने अंगणवाडी साहित्य खरेदी, एलईडी बल्ब बसवणे आणि विशेषतः पाईपलाईन टाकण्याच्या कामात मोठा अपहार केल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष जमिनीखाली ५० पाईप टाकले असताना कागदोपत्री १५० पाईपचा वापर दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच, सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने बोगस सह्या करून ई-टेंडर प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. जोपर्यंत विशेष चौकशी समिती नेमली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button