तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशा

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशामुक्ताईनगर प्रतिनिधीमुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २ मध्ये ‘Mentoring by Eminent Expert & Expert Talk’ हा विशेष मार्गदर्शनपर उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि करिअरविषयक योग्य दिशा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी आमंत्रित मान्यवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षा, आधुनिक तंत्रज्ञान, करिअरच्या विविध संधी तसेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून उच्च शिक्षण व उज्ज्वल भवितव्यासाठी नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम नियमितपणे राबविण्याचा मानस शाळा प्रशासनाने व्यक्त केला.



