खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमलकापूरमहाराष्ट्रसंपादकीय

नायलॉन मांजावर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’; जळगाव पोलिसांचा कडक इशारा


जळगाव | प्रतिनिधी
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर आता थेट भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 110 अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ असा गंभीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा जळगाव पोलिसांनी दिला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
नायलॉन मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार, पक्षी व प्राण्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असल्याने, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्हाभर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पतंग विक्री दुकाने, गोदामे व साठवणूक ठिकाणांवर तपासणी करून नायलॉन मांजा जप्त केला जाणार असून विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी नागरिक व पालकांना नायलॉन मांजा वापर टाळण्याचे आवाहन करत, अशा प्रकारची विक्री आढळल्यास तात्काळ डायल 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे सांगितले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश जळगाव पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button