खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

रमाई आवास योजनेतील गळती व भोंगळ कारभाराविरोधात भाजपा कडून निवेदन !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपात गंभीर अनियमितता, गळथांग आणि भोंगळ कारभार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

या संदर्भात भाजप उपाध्यक्ष संतोष भीमराव झनके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंचायत समिती मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी यांना सविनय निवेदन सादर केले असून संबंधित जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, शासनाच्या उद्देशानुसार ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. मात्र वास्तवात, काही आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली लोकांनी आपल्या घरातील सदस्यांच्या नावावर चार ते पाच घरकुल मंजूर करून घेतल्याचे आढळून आले आहे.

यामुळे खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button