जळगावा जिल्हामहाराष्ट्र

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग येथील विद्यार्थांना दिवाळी भेट ………..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर

पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ व तडवी द गाईड गृप यांच्यातर्फे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले…… प्रथम आलेले प्रतिनिधी श्री अश्पाक तडवी, श्री दस्तगीर तडवी , श्री आसिफ तडवी , श्री हर्षल तायडे यांचे स्वागत पुष्प व पुस्तक देऊन करण्यात आले . नंतर श्री अश्पाक तडवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व अभ्यास व शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.सर्व विद्यार्थ्यांना मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या हस्ते किराणा साहीत्य , खाऊ , शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साईनाथ चन्ने सरांनी केले व आभार श्री विकास सुरवाडे सरांनी मानले . कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युनूस तडवी, सदस्य आसिफ तडवी, अकबर तडवी, सिकंदर तडवी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button