जळगाव वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे विमानतळ रिक्षा थांबा कुसुंबा उदघाटन सोहळा संपन्न:- (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) !

सविस्तर वृत्त असे की वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित जळगाव विमानतळ रिक्षा थांबा,कुसुंबा चे उदघाटन दिनांक 12/10/2025, रविवार रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता जिल्हाध्यक्ष श्री दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जळगांव चे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले यावेळी गोसेवाव्रती,पृथ्वी बचाव फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष , कायदेतज्ञ ॲड. विजय जी काबरा उपस्थित होते थांबा साठी श्री वाल्मिक सपकाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिवसेन दिवस जळगाव विमानतळवरून विमानाचे उड्डानाचे वेळापत्रक वाढत असून प्रवासी संख्या वाढत चालली आहे रात्री बे रात्री जळगाव शहर ते विमानतळ अंतर जास्त असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवास्याची गैरसोय होऊ नये म्हणून वीर सावरकर रिक्षा युनियन ने येथे थांबा चे नियोजन केले यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून स्वामी राजेस्वरानंदजी सरस्वती,विमान पत्तन अधिकारी श्री हर्षल त्रिपाठी, श्री निर्मल बारा,MSF इन्चार्ज श्री शेख साहेब या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी थांबा अध्यक्ष श्री शांताराम पाटील,उपाद्यक्ष श्री देविदास पाटील,सदस्य रामदास पाटील ,अरुण पाटील, हर्षल राजपूत, सागर सोनवणे, सूरज राजपूत , राहुल पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र कोळी,अभिजित बाविस्कर, अजय पाटील, कुसुम्बा ग्रामस्थ विलास बाविस्कर , राधेश्याम चौधरी, धनराज पाटील, कुलकर्णी अप्पा यांची उपस्थिती होती.



