क्रिडाखानदेशजळगावा जिल्हा
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन

मुक्ताईनगर प्रतिनिधी –
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अल्फाला उर्दू हायस्कूल येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये शकूर जमादार, अरिफ आझाद, नूर मोहम्मद खान, अफसर खान, हारून शेख तसेच कवी तौकीर शेख यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमुळे तालुक्यातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागून समाजात ऐक्य व बंधुभाव वृद्धिंगत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



