खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रराजकीय

मुक्ताईनगरात समाजाभिमुख उपक्रमातून नेत्रतपासणी शिबिर संपन्न मुक्ताईनगर :

लोकप्रतिनिधी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत असतील, तर त्यांचा वाढदिवसही जनसेवेचा उत्सव ठरतो. याच भावनेतून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे आयोजित नेत्रतपासणी शिबिर हे एक आदर्श उदाहरण ठरले.

चंदकांताबाई नेत्रालय जळगाव यांच्या सहकार्याने आणि चंद्रकांत पाटील युवा फाउंडेशनच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १६६४ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जळगावला रवाना करण्यात आले. अशा प्रकारे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

शिबिरात रुग्णांना औषधे, चष्मे, तपासणी या सुविधा मोफत देण्यात आल्या. तसेच शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांच्या निवास, जेवण व प्रवासाची जबाबदारी आयोजक मंडळाने स्वीकारली. यामुळे सर्वच रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय सुखावले.

या उपक्रमात वैद्यकीय तज्ञ, स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी मनापासून योगदान दिले. समाजासाठी केलेली ही सेवा म्हणजे खरी लोकसेवा असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम विधायक ठरल्याचे नागरिकांनी नमूद केले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले हे आरोग्य शिबिर ‘समाजाच्या डोळ्यांत प्रकाश फुलवणारे कार्य’ म्हणून स्मरणात राहील, यात शंका नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button