मुक्ताईनगर शहरांमधून दररोज वाहतूक होणाऱ्या गुटख्याला स्थानिकपोलिसांचे अभय? नागरिकांत चर्चा?

मुक्ताईनगर
मुक्ताईनगर लागून मध्य प्रदेशची सीमा असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे ही वाहतूक रोजच्याप्रमाणे सुरळीत चालू असते.
रोज रात्री दहा वाजेपासून ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत किंवा कधीकधी दिवसा सुद्धा रोजची वाहतूक या गुटख्याची मुक्ताईनगर मधून करोडो रुपयांची होत असते.
नागरिकांचे सुद्धा असे म्हणणे झाले आहे की नाशिक येथील पथक व जळगाव एलसीबी पथक हे येऊनच कारवाई करू शकतात मग ते मुक्ताईनगर पोलीस स्टेशन का कारवाई करू शकत नाही.. दोन दिवसा आधीच एलसीबी पथकाने लाखोंचा गुटखा मुक्ताईनगर येथे जप्त केला. पूर्णाड फाटा येथे पोलीस ची नियुक्ती दररोज केलेली असते मग त्यांना या गुटख्याच्या गाड्या दिसत नाही का?
स्वतः आमदार चंद्रकांत पाटील यांनीखूप वेळ विमल ची गाड्या पकडून पोलिस कडे स्वाधीन केल्याआमदार पाटील आणि खडसे यांनी विधान सभा आदिवेशन मधे हे विषय काढूनमहाराष्ट्र लक्ष वेधेल तरीविमल विक्री आणि वाहतूक सरस सुरू आहे
डायरेक्ट गुटख्या वाले सांगतात की आम्ही तुमच्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दर महिना पैसा पुरवतो म्हणून रोज मुक्ताईनगर मधून कोट्यावधी रुपयांची गुटख्याची उलाढाल होत असते..
तरी पोलीस प्रशासन गुटख्या माफियांकडून एवढा पैसा घेऊन बिनधास्तपणे मुक्ताईनगर मधून गुटख्याच्या गाड्यांची वाहतूक सुरळीत ठेवत असून पोलिसांच्या भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.
जळगाव वरून येऊन एलसीबी पथक कारवाई करू शकते मग स्थानिक पोलीस कारवाई का करू शकत नाही?
नुकतेच दोन दिवस आधी जळगाव वरून येऊन एलसीबी पथकाने कारवाई करून कोट्यवधीचा गुटखा पकडला मग स्थानिक पोलीस का कारवाई करू शकत नाही? 60 किलोमीटर दूरवरून येऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करू शकते? मग मुक्ताईनगर पोलीस का कार्यवाही करू शकत नाही नेमके यांच्यावर दबाव कोणाचा अशी चर्चा नागरिकात रंगली आहे?
अवैध धंद्यांच्या कलेक्शन साठी चार ते पाच कर्मचाऱ्यांची वर्णी लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे?*
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या हफ्त्याच्या कलेक्शन साठी चार ते पाच कर्मचाऱ्यांची वर्णी लागल्याची चर्चा नागरिकात सुरू असून नेमके एवढे कर्मचारी वसुलीसाठी ठेवण्याचे कारण काय म्हणजे एवढे कलेक्शन वाढले की चार-पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते अशी उलट सुरत चर्चा नागरिकात रंगत आहे? व यामुळे काही कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे?



