‘कर्जमुक्ती’ साठी अर्ज दाखल करण्याचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय !, किसान ब्रिगेडच्या मुख्यालयी शेतकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म. घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला : ‘किसान ब्रिगेड’ च्या १७ मे रोजी राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठकीमध्ये ‘किसान ब्रिगेड’ च्या मुख्यालयी झालेल्या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी लगावली होती उपस्थिती. या बैठकीमध्ये २६ मे रोजी राज्यभर २० लाख कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
सामाजीक कार्यरकर्ता प्रियंका रमेश केदार यांच्या कडुन प्राप्त माहितीनुसार अकोल्यातील ‘किसान ब्रिगेड’ च्या मुख्यालयी शनिवारी १७ मे रोजी शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली १४ मे रोजी कर्जमुक्तीचे किती अर्ज दाखल झाले याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.





राज्यातील सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू’, अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. त्याचा विसर राज्याकर्त्यांना पडला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनात राज्यभर १४ मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे ‘कर्जमुक्ती अर्ज सादर करण्याचे आंदोलन छेडण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती करिता अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. नागपूर, गडचिरोली, यवतमाळ ,बुलढाणा ,वाशिम, अकोला हे जिल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आमचा अर्ज भरायचाच राहिला म्हणून कृपया दुसरा टप्पा सुरू करावा या करिता या बैठकीमध्ये व्यक्तीशा हजर राहून सूचना केली, त्यावर साधक-बाधक चर्च्या होऊन दुसऱ्या टप्प्यातील अर्ज सादर करण्या करिता सोमवार २६ मे ही तारीख निश्चित करण्यात आली. बैठक संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पुस्तकाचे / बॅनर, स्लोगन व अर्जासोबत जोडायचे पत्र व यादी इत्यादीचे वाटपही करण्यात आले. २६ मे रोजी राज्यभर २० लाख कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शनीवारी १७ मे रोजी किसान ब्रिगेड कार्यालय, निशांत टावर, अकोला येथे अर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. एकंदरीत ‘किसान ब्रिगेड’ च्या या कर्जमुक्ती अभियानाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या कार्यक्रमाला किसान ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, अकोला जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, जिल्हा कार्याध्यक्ष शरदराव वानखडे, काशिनाथजी साबळे, विजय भाऊ दातीर, विठ्ठलराव कुलट, ॲड. साहेबराव मोरे, गजानन अमदाबादकर याचे सह प्रवीण दराडे, दिनेश खेडे, विवेक टेकाळे, नईम पटेल, गजाननराव साबळे, विठ्ठलराव महल्ले, प्रदीप पाटील गावंडे, संतोष पाटील लोणाग्रेकर, विलासराव शेळके, भास्करराव इंगळे, अच्युतराव गोबरे, दिगंबर वाकोळे, ज्ञानदेव हिवाळे, आत्माराम घाडगे, मनोहर पाटील, शंकर शेगोकार, बाबाराव डोंगरे, दादाराव अंभोरे, भारत भगत, प्रल्हाद घुगे, श्रीराम राऊत, श्रीकृष्ण हिरुळकर, रामदास वानखडे, अर्जुन खडसे, उमाजी मनोहर, निळकंठ राव दौड, अण्णा सुरजुसे, नाजूकराव घाटोळे, संजय गाडगे, गजानन मालठाणे, रामराव घोगरे, शेषराव पुंजाजी वानखडे, मोतीराम ठाकरे, दादाराव धाडसे, पुंजाजी जामोदे आदिंनी आवर्जून उपस्थिती लगावली होती.



