Uncategorized

एकलव्य गणेश उत्सव मंडळ वरवट खंडेराव येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी,

रतन भगत,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.

  सविस्तर वृत्त असे की ,दरवर्षीप्रमाणे वरवट खंडेराव येथे एकलव्य गणेश उत्सव मंडळातर्फे गणपती बसविण्यात येते .त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा या मंडळांनी गणपती बसविला आहे .मात्र या मंडळाचे विशेष महत्त्व म्हणजे हे मंडळ फक्त गणपती बसवण्याचे काम करत नसून ,त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करते त्यामुळे गावातील मुला मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगणी विकास होतो. काल या एकलव्य गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये डॉक्टर विलास चौधरी व त्यांची तज्ञ टीम उपस्थित होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार श्री प्रशांत पाटील साहेब हे देखील उपस्थित होते. तहसीलदार साहेबांनी वरवट खंडेराव येथील जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन त्या शाळेची पाहणी केली, व येथील जीर्णअवस्थेतील असलेल्या व शिकस्त वर्ग खोल्यांची पाहणी करून तहसीलदार साहेबांनी तातडीने नवीन वर्ग खोल्या व जुन्या खोल्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत गावातील बरेचसे एकलव्य गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .त्यांच्यासोबत गावाचे जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंता गाळकर हे सुद्धा उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button