Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हा

निमखेडी खु. येथे बंद घर फोडून तब्बल 7.22 लाखांचे दागिने लंपास – अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):


मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात दिनांक 26 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे 7 लाख 21 हजार 956 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 305 व 331(4) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात विलास विठ्ठल डहाके (वय 56 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. निमखेडी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 26 जुलै 2025 रोजी रात्री 10.30 ते 27 जुलैच्या पहाटे 4 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरातील विविध सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले. फिर्यादी हे त्यांच्या खालील रूमला कुलूप लावून वरती असलेल्या रूम मध्ये झोपण्यासाठी परिवार समवेत गेले होते

चोरट्यांनी घरातून लंपास केलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये:

1)39520 रू किमतीचे 10.030 ग्रॅम वजनाची सोन्याची गठणी
2) 10090 रू किमतीचे 2.410 ग्रॅम वजनाचे चाफे
3) 61353 रू किमतीचे 20.050 ग्रॅम वजनाचे गहू मणी
4)45961 रु किंचे 15.020 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया
5)6340 रु किंचे एक सोन्याचे पेंडल 02 ग्रॅम वजनाचे
6)3190 रु किंचे दोन कानातील बाळया 01 ग्रॅम वजनाच्या
7)76721 रु किंचा एक सोन्याचा चपला हार 24.950 ग्रॅम वजनाचा
8)28566 रु किंचे कानातील दोन काप 10.130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे
9)23120 रु किंच्या सोन्याच्या कानातील 04 बाळया 08 ग्रॅम वजनाच्या
10)85000 रु किंचा एक सोन्याचा फॅन्सी हार 10 ग्रॅम वजनाचा
11)172000 रु किं चा एक सोन्याचा चपला हार 20 ग्रॅम वजनाचा
12)50100 रु किंचा सोन्याचे कानातील दोन साकळया 06 ग्रॅम वजनाचा
13)41750 रू किंचा सोन्याचे कानातील दोन साकळया 05 ग्रॅम वजनाच्या
14)42250 रु किंचे एक 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
15)13200 रु किंच्या चांदीच्या 300 ग्रॅम वजनाच्या पाटल्या
16)13200 रु किंच्या चांदीच्या 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे
17)1470 रु किंचे चांदीचे 18.40 ग्रॅम वजनाचे बिचवे
18)535 रु किंचे चांदीचे 5.00 ग्रॅम बदामी अंगठी
19)390 रु किंचे चांदीचे 3.300 ग्रॅम वजनाचे २ चपल्या असा एकूण 7,21.956 रू ऐवज
कानातील चापे, साकळ्या, बाळया, अंगठ्या ३०० ग्रॅमच्या चांदीच्या पाटल्या आणि कडे बिचवे, बदामी अंगठी, चांदीचे चपले
अशा विविध वस्तूंचा समावेश असून एकूण किंमत रु. 7,21,956/- इतकी आहे.

सध्या पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासह चोरी गेलेला माल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विविध संशयितांचा शोध घेतला जात आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button