खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

मुक्ताईनगरात शिवसेनेचे संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त!

मुक्ताईनगर (ता. २४ जुलै) :

मुक्ताईनगरचे आमदार मा. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली –
माजी नगरसेवक व पत्रकार संतोष सुपडू मराठे यांची ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (कार्यक्षेत्र – रावेर लोकसभा)’
निलेश मोहन मेढे यांची ‘मुक्ताईनगर तालुका प्रसिद्धी प्रमुख’
पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या स्वाक्षरीनिशी नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. या नेमणुकीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा आहे. नाविन्याने सुरू होत आहे.

शिवसेनेच्या प्रचार-प्रसाराला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी
शिवसेनेच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्याची इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात प्रभावीपणे प्रसिद्धी करून पक्षवाढीस हातभार लावण्याची जबाबदारी मराठे आणि मेढे यांच्यावर सोपवण्यात आली असून, पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास दोघांनीही यावेळी व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button