खानदेशजळगावा जिल्हासामाजिक

महाविहार मुक्ती आंदोलनात जळगावचे कार्यकर्ते होणार प्रत्यक्ष सहभागी : जयसिंग वाघ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

महाविहार मुक्ती आंदोलनात जळगावचे कार्यकर्ते होणार प्रत्यक्ष सहभागी : जयसिंग वाघ
जळगाव :- बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी बुद्ध गया येथे दिनांक १२ फेब्रुवारी पासून बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत . या आंदोलनात जळगाव येथील १७ कार्यकर्ते २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत अशी माहिती साहित्यिक जयसिंग वाघ यांनी दिली .
जयसिंग वाघ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे की , जळगाव जिल्ह्यातून १०००० सहयांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री , भारताचे राष्ट्रपती , प्रधानमंत्री , विरोधी पक्षनेते ( लोकसभा ) यांना २१ एप्रिल रोजी पाठविण्यात आले . दिनांक २३ एप्रिल रोजी गया येथील जिल्हाधिकारी तसेच महाबोधी महाविहार समितीचे अध्यक्ष तसेच आंदोलनाचे प्रमुख भांतेजी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देणार आहेत . त्यानंतर प्रत्यक्ष आंदोलन स्थळी सहभागी होणार आहेत .
जयसिंग वाघ यांचे समवेत ॲड. आनंद कोचुरे , राजुभाई मोरे , बाबुराव वाघ , दिलीप तासखेडकर , अशोक सैंदाणे , नथु अहिरे , चंद्रशेखर अहिरराव , प्रा. डॉ. सत्यजित साळवे , प्रसिद्ध गायक शरद भालेराव , रंगकर्मी उदय सपकाळे , सुभाष वाघ , डी. झेड. मोरे , डॉ. सी. यू. भालेराव , हरिश्चंद्र सोनवणे , रामभाऊ शिरसाठ , विनोद रंधे , ई. कार्यकर्ते बुद्ध गया येथील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button