गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

कापड दुकानदारास मारहाण ; गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शहरातील एका रेडीमेड कापडाच्या दुकानदारास चौघांनी मारहाण केल्याची तक्रार शहर पो.स्टे.ला देण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात फिर्यादी रोहित चंद्रकांत पातुरकर (२६), रा.शंकर राजेश्वर कॉलनी शेगाव यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार २० एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजताचे सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र गौरव झाडोकार व ओम नादोकार असे तीघे खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करित असताना तेथे हरीश पारखेडे, राम चव्हाण,

निखील पारखेडे व एक अनोळखी इसम यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीने जवळपास दोन महिन्यांपुर्वी आरोपी हरीश पारखेडे याला त्याचे रेडीमेड दुकानातून पॅन्ट बदलून दिली नाही त्याच्या रागातून सदर मारहाणीची घटना झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरूध्द कलम ११८ (१), २९६,३(५), ३५१ (२) भान्यासंनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोहेकॉ संजय करूटले हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button