Uncategorized
कु .माधुरी बगे न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी माधुरी बगे
न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग-२०२२ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश मधुकर बगे यांच्या कन्या कु. माधुरी बगे हिने घवघवीत यश मिळविले आहे. माधुरी हिचे कायद्याचे शिक्षण नारी गुरसहानी लॉ कॉलेज उल्हासनगर येथे झाले आहे. या परीक्षेसाठी पुणे येथील शिक्षक गणेश सिरसाट यांचेसह यापूर्वी झालेल्या परीक्षेतून न्यायाधीश पदावर निवड झालेले त्यांचे भाऊ व वहिनी अभिषेक बगे व रेणुका अभिषेक बगे (मोरे) यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय ती तिच्या आईवडिलांना देते



