संपादकीयसामाजिक

जाकतिक महिला दिनाच्या निमित्ताने

    आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी. न्यूयार्क येथे पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला असला तरी सन १९१० च्या  आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. हा दिवस महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी  जागतिक महिला  दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
   संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण आहे. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपल्या परीने संघर्ष करीत होत्या १८९० ला अमेरिकेमध्ये मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिका सप्रेजिस्ट असोसिएशनची स्थापना झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. ८ मार्च १९७९ हा दिवस आणखी एका कारणायासाठी लक्षात राहिला. इराणच्या स्त्रियांनी स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क उपभोगण्यास मिळावा याकरिता उठवलेल्या आंदोलनाकरिता पन्नास हजार स्त्रियांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.जेव्हा जेव्हा जगातील स्त्री जमातीवर अन्यायाने कहर केला, तेव्हा तेव्हा त्यांनी एकजुटीने प्रचंड ताकतीनिशी त्यांचा प्रतिकार केला. ८ मार्च हा त्यांच्या अस्तित्व हक्काच्या लढ्याचा मानबिंदू आहे.
   दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून  आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांकरिता मतदात्यांपासून  वाचण्याकरिता  स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा,अशा प्रकारचे आवाहन स्त्रिया करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरी  कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला. आणि क्रांतिकारी  मार्क्सवाद्यांनी केलेल्या हक्काच्या मागणीला पाठींबा दिला. १९०७ सली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्यामध्ये क्लारा  झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.
    ८ मार्च १९०८ रोजी न्यूयार्क मध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामांच्या जागी सुरक्षितता ह्या  मागण्या केल्या. या दोन मागण्या बरोबरच लिंग,वर्ण,मालमत्ता आणि पार्श्वभूमी, निरपेक्ष, सर्व प्रौढ, शैक्षणिक, स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या व्यापक कृतीने क्लारा झेटकीन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपन हेगण येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री  कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला. यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
     आज स्त्रियाचे कार्यक्षेत्र फक्त चुल व मूल इतकेच मर्यादित राहिले नाही. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही तिने आपली सक्षमता सिद्ध केली आहे. स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, लहानग्याला पाठीशी बांधून रणांगनांवर लढणाऱ्या बहादुर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अलैकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाला गवसणारी कल्पना चावला, पहिला महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, अनाथ, दीनांची माय सिंधुताई सपकाळ आणि आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी झटकणारी प्रत्येक स्त्री या सर्वांनी बिकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे. आज स्त्री-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.
    आजची स्त्री समाजातील प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. ग्रामसेविकापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. एवढेच नव्हे शिक्षिका, पोलीस, डॉक्टर,खेळाडू अशा सर्व क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी केली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे मानले जाते.  प्रत्येक संकटात स्त्री संपूर्ण कुटुंबाची ढाल बनते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि कर्तुत्वाच्या प्रत्येक प्रांगनात स्त्रिया पुरुषांची बरोबरी करू शकतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, राजाराममोहन राय यांच्या आतंरिक तळमळीने केलेल्या अथक परिश्रमामुळे स्त्रियांना शिक्षणाची, प्रगतीची दारे खुली झाली. स्त्रियांनी उन्नतीची उत्तुंग शिखरे पदाक्रांत केल्याचेही अनेक उदाहरणे आहेत., तरीही आज स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की अंधश्रद्धा, लैंगिक अत्याचार, इत्यादी अनेक समस्यांमुळे स्त्रियांचे जीवन धोक्यात आले आहे. समस्यांचे निर्मूलन करून स्त्री पुरुष समानता समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्रीला समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी सर्वांनी स्त्रीला प्रोत्साहन दिले पाहिजे. थोर स्त्रियांचे विचार मनात ठेवून प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनायला हवे. कुटुंबातील महिलांच्या विकासामुळे देशाचा विकास होईल. महिला स्वातंत्र्य हेच महिला दिन साजरे केल्याचे खरे सार्थक आहे.
  महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान. नारी आता अबला नाही, संघर्ष आमूचा चालू राहील. बरोबरीने साथ चला, स्त्रियांनो पुढे या आता. नारीत आहे शक्ती भारी, समजू नका तिला बिचारी. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान.......,

 कु. रुपाली जगन्नाथ बनकर
      (वर्ग ८ वा)
 जि. प.मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु।
  ता. संग्रामपुर जि.बुलडाणा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button