श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत भव्य दिव्य असे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न .

दिवा – (सचिन शेलवले ) सोमवार दिनांक 30/12/2024 मध्ये श्री . गणेश विद्यामंदिर शाळेत या शैक्षणिक वर्षात भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शन , हस्तकला प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन दिनांक 30/12/24 ते 31/12/24 पर्यंत दोन दिवस आयोजित करण्यात आले . प्रथमता विज्ञान प्रदर्शन चे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव साईनाथ लक्ष्मण म्हात्रे यांच्या सोबत केतकी साईनाथ म्हात्रे , दिनेश लक्ष्मण म्हात्रे, गिता दिनेश म्हात्रे हे पदाधिकारी तसेच माध्यमिक मुख्याध्यापक चौधरी सर तसेच इतर शिक्षकवृद उपस्थित होते . विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे यांनी गणेशाचे पुजन करून, श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते लाल रिबन कापून करण्यात आले . त्यानंतर संगीतमय आवाजात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शना वर आधारीत गित म्हटले . त्यानंतर संस्थेचे प्रमुख पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यानी बनविलेले सुंदर प्रयोग, हस्तकला प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन स्वःत जवळून जाऊन पाहिले . त्याच दिवशी सोमवारी ठिक 12.00 वाजता शाळेत येणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी प्रत्यक्ष भव्य दिव्य अशा विज्ञान प्रदर्शनाला भरभरून भेट दिली . विज्ञान प्रदर्शनात लहान व मोठा शिक्षू यांनी सुद्धा आपले प्रकल्प छान मांडले होते . खुप छान प्रयोग एवढ्याशा लहान वयात छान मांडणी केली होती . त्यांच्या कडुन शिकण्यासारखे वाटले . दुसऱ्या दिवशी इतर आजू बाजूच्या शाळेच्या विद्यार्थ्यानी भेट दिली . सर्व विद्यार्थ्यानी मेहनत करून खुप चांगल्या प्रकारे प्रदर्शनात आपले प्रयोग मांडले होते . रांगोळी, हस्तकला, चित्रकला या माध्यमातून प्रत्येकानी आपली कला तसेच आपल्या भावना प्रदर्शित केल्या . त्या विद्यार्थ्याच्या मागे सर्व विर जिजाऊ बाल सस्कार केंद्र, गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा प्राथमिक, माध्यमिक विभाग, माय मदर इंग्लिश स्कुल, लिलावती कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे सर्व शिक्षकवृंद यांची मेहनत तसेच त्यांनी केलेले कौतुक दिसुन आले . दोन दिवसातून खुप शिकण्या सारखे मिळाले . सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या कला प्रदर्शित केल्या होत्या . शेवटी चांगल्या बनविलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना तसेच रांगोळी, हस्तकला, चित्रकला यांना क्रमांक देऊन त्यांचे विशेष कौतुक संस्थेच्या हस्ते करण्यात आले .



