Uncategorized

बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गै व्यवहार प्रकरणातील तीनही आरोपी अटकेत तहसीलदार शितल सोलाट यांची चौकशी होणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे

22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई अहवाल बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा आर्थिक गै व्यवहार तत्कालीन तहसीलदार शितल सोलाट यांच्या कृपेने तलाठी उमेश बिलवार तलाठी अनंता माटे व संगणक चालक महादेव पाटील या आरोपी विरुद्ध जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून संबंधित चौकशी अधिकारी तपास अधिकारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जुलै 2023पासून फरार आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने 25डिसेंबर 2024 रोजी पकडण्यात आले होते आरोपींना अटक करण्यासंबंधी संबंधित अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत यांचे प्रमाण त्यांनी दिले असले तरी मुख्य सूत्रधार ज्यांच्या मार्गदर्शनात काम करणारे तलाठी संगणक चालक हे तत्कालीन तहसीलदार यांच्या आशीर्वादा असताना त्यांच्या चौकशीमध्ये कारवाही बाबत प्रतिक्रिया घेतली नसल्याने गुन्हे अन्वेषण विभागाचे तपास अधिकारी यांचे वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत नुकतेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलढाणा यांनी तीन फरार आरोपींना पकडून जळगाव जा न्यायालयासमोर हजर केले विद्यमान न्यायालयाने तिन्ही आरोपींना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जळगाव जामोद तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसीलदार यांच्याकडे 2023ची अतिवृष्टीचा निधी लवकरात लवकर खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना हा निधी देण्यात यावा असे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button