Uncategorized

“महायुती सरकारच्या दबावाखाली पोलिसांची दादागिरी केली पैशाची मागणी”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी अजय गायकवाड

वाशिम : – वाशिम येथे महाविकास आघाडीच्या वाशिम मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा दि.११ नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या सभेला येणाऱ्या जिल्हाभरातून महाविकास आघाडी कार्यकर्त्याच्या व मतदाराच्या गाड्या अडवण्याचे काम वाशिम- रिसोड रस्त्यावर ट्रॅफिक पोलीसाचा ड्रेस नसतांना खाकी वर्दीत असलेले पोलीस वसुलीच्या कामासाठीच असल्याचे प्रचाराच्या सभेला भाषण ऐकण्यासाठी जात असलेल्या लोकांनी सांगितले त्यांनी पैशाची मागणी केली असता, गाडीतील लोकांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी कारवाई करण्याच्या धमक्या दिल्यामुळे गाडीतील सर्वच लोक त्यांच्यावर चिडून बोलू लागले. त्यामध्ये रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय शिंदे यांनी कोणीही पैसे देणार नाही !असे स्पष्टपणे ठणकावून सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी सुद्धा निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली त्यामध्ये आक्षेपार्ह असं काही सापडलं नाही परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला आपण या अगोदर कुणाच्याही सभेसाठी जाणाऱ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली का?त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी नकारार्थी उत्तर दिले त्यामुळे जाणून-बुजून निवडणूक अधिकारी व पोलीस हे महाविकास आघाडीच्या दबावाखाली काम करतात का ? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जनतेत सुद्धा याविषयी रोष निर्माण होतांना दिसतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करतांना एबीपी माझा या न्यूज चैनलने ही बातमी प्रकाशित केली. तर वाशिम- रिसोड रस्त्यावर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जाणाऱ्या लोकांची गाडी अडवल्याने पोलिसा प्रती सुद्धा या लोकांनी रोष व्यक्त केला. याबाबत खरं काय ? खोटं काय ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे. तरी अशा प्रकाराला वरिष्ठ अधिकारी हे झाकण्याचा प्रयत्न करतात, की कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button