Uncategorized

महायुतीचे उमेदवार चैन सुख संचेती प्रचारार्थ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बघण्यासाठी नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थित

मलकापूर प्रतिनिधी :- मलकापूर शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारोंच्या संख्येने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी या सभेला हजेरी लावली
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मलकापुरातील जनता वाणिज्य महाविद्यालया च्या भव्य पटांगणावर सभा संपन्न झाली.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सुरू झाले आहे सुरू झाले आहे त्यामुळे मलकापूर मतदार संघातून विधानसभा उमेदवार संचेती यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी सुद्धा सभेला उपस्थिती लावली
आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, आमदार बसंत खंडेलवाल यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सुद्धा सभेला उपस्थिती लावली
यावेळी चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ आलेल्या सर्व पक्ष नेते यांनी
सभेचा मोर्चा सांभाळला तर भाजपा महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही आणि सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा जीवाचं रान करून कामाला लागायचं आणि चैनसुख संचेती यांना निवडून आणायचं यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली तर सभेसाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री यांनी बुलढाणा जिल्ह्याचा विकास यावर भर देत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्व आमदार निवडून आणायचे व महायुतीला बळकट करण्याचं काम सर्वांनी करावं तसेच मलकापूर क्षेत्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षात विकास कामाचा धडाका लावू या आशयावर बोलून महायुतीच्या उमेदवारांना आपण निवडून दिलं तर मोदीजींचे हात बळकट होतील व देशात व हिंदुत्व कायम राहील महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीकडून अनेक योजनांचा लाभ जनतेला मिळालेला आहे आता जनतेचा कौल महायुतीकडे राहावा यासाठी पुढेही अशाच योजनांचा फायदा आमच्या सरकार जनतेला देणार आहे म्हणून मलकापूर विधानसभा मध्ये भाजपा आमदार चैनसुख संचेती यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशा प्रकारची विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे

चौकट क्रमांक एक

महायुतीचे उमेदवार मलकापूर मतदारसंघात चैनसुख संचेती, खामगाव मतदार संघात आकाश फुंडकर, चिखली मतदार संघात श्वेताताई महाले तसेच जळगाव जामोद मतदार संघात संजय कुठे यांना भरघोस मतांनी विजयी करा व भाजपाचे हात बळकट करा

  • अमितभाई शहा
    (केंद्रीय गृहमंत्री)

चौकट क्रमांक दोन

महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यास लाडके बहीण योजनेचे मानधन वाढवून 2100 रुपये करणार .

किसन सन्मान योजनेचे मानधन वाढवून 15000 करणार .

युवकांसाठी दरवर्षी 25 लाख नोकऱ्या ची निर्मिती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button