Uncategorized

मनसेचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या हिवरखेड येथील प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनीधी विजय घोडे

हिवरखेड – दि. ९ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या चंडिका चौक हिवरखेड येथील मनसे प्रचार कार्यालयाचे गुरुवार दि 7 नोव्हें. 2024 रोजी अकोट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंगदादा तट्टे यांच्या उपस्थितीत भगवी फीत कापून भव्य उद्घाटन करण्यात आले.
या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी कॅप्टन सुनील डोबाळे यांनी गावातील वसलेले ग्रामदैवत चंडिका देवी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत जनतेची सेवा करण्याकरता चंडिका देवीला साखळे घातले. त्यानंतर विधिवत गावामधून कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली .या रॅलीमध्ये असंख्य नागरिक सहभागी झाले होते. यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी सभेमध्ये विविध उपस्थित मान्यवरांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उर्वरित हिवरखेड मधील आयोजित दौरा मुख्य रस्त्यावरून पायी चालत केला तसेच वाटेमध्ये येत असलेल्या भवानी मातेलाही आपल्या विजयाकरिता साकळे मी घातले आणि रस्त्यामध्ये जे जे नागरिक स्वागतासाठी उभी होती, त्यांचे आशीर्वाद मागत तुमचे सेवेसाठी मला पुढील पाच वर्षाकरिता आपले अमूल्य मत देऊन विधानसभे करिता निवडूण द्या आणि विकास काय असतो याचा प्रत्येय तुम्हीच घ्या असे त्यांनी जनतेला प्रत्यक्ष भेटीदरम्यान सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button