तेल्हारा नगरपरिषदे चा. उपक्रम जनजागृती अभियान

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता. प्रतिनिधी विजय घोडे✍️.तेल्हारा आज दि.31 3 2023 रोजी तेल्हारा नगरपालिका स्तरावर “स्वच्छ महोत्सव 2023” स्वच्छ भारत अभियान(नागरी) आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान DAY-NULM अंतर्गत जनजागृती प्रभात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सकाळी 9.00वाजता न.प. शाळा क्रमांक 1 मधून निघणार असून या रॅलीमध्ये शाळेचे विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारी, महिला बचत गट तसेच शहरातील सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तेल्हारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश गावंडे यांनी केले आहे ,ही रॅली नगरपरिषद शाळा क्रमांक एक पासून सुरू होत जुने स्टॅन्ड ,संताजी चौक, पोलीस स्टेशन मार्गे नगर परिषद तेल्हारा येथे येऊन या जनजागृती रॅलीची सांगता करण्यात येईल, नंतर नगरपरिषद सभागृह येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या “टाकाऊ पासून टिकाऊ” वस्तूंची प्रदर्शनी भरवण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी ही प्रदर्शनी पाहण्याकरिता सुद्धा यावे असेही आवाहन त्यांनी केले.



