“कुकर ने वाढवले प्रेशर! पण गॅसने कोणाची पोळी भाजणार?”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघातील तीनही तगड्या उमेदवारातील रस्सीखेच मध्ये कोणाचं भलं होणार ? हे येणारा काळच सांगेल ! सध्या स्थितीत मतदारांची मनाची स्थिती डामडौल आहे. कुणाच्याही मनाचा सध्यातरी थांगपत्ता लागेना, चर्चेला मात्र अनेक उधान येत असून या वादळामध्ये कुणाची नौका पार होणार ? यांचे चित्र स्पष्ट होण्यासाठी थोडा अवधीच लागणार? म्हणावं तेवढी रिसोड मतदारसंघातील लढाई सोपी मात्र नक्कीच नाही.कुणीही , कोणत्याही पार्टीचे कार्यकर्ते मनाचा ठाव घेऊ शकत नसल्याने हि परिस्थिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे.तगड्या फाईटचीच मतदारसंघात चर्चा कायम आहे.कुकराने दोन्ही आमदाचे प्रेशर वाढवून गॅसचा आधार कुणाची दाळ शिजवेल हेही सांगायला मतदार या क्षणी तयार नाही.दरम्यान मतमोजणी दरम्यान चढ-उतार भयानक प्रकारचे येतील.त्यामुळे ह्रदयविकाराच्या व्यक्तीच्या आवाक्याबाहेर हि निवडणूक निश्चितच असणार आहे.त्या लोकांनी या विषयामध्ये रुची वाढउ नये.मध्ये पडू नये.गॅस कुकराला सोयीचा पडणार कि हातासाठी?,टाके पाडणारी मशीन हाताच्या सोईची होईल कि कुकराला ? येणारी वेळच ह्या बाबी व मतदारच ठरवणार, भावी आमदारांचे भविष्य! रिसोड मतदारसंघात सहा उमेदवारांनी आपले भरलेले नामांकन परत घेतले तर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.



