Uncategorized

फिटाच्या आजाराला कंटाळून हिवरखेड येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड दि.24 ऑक्टोंबर|

हिवरखेड येथील अरुण वाकोडे (वय अं.44) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मृतक अरुण वाकोडे हे हमालीचे काम आणि मेहनतीची कामे, मोल-मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत होता. त्याला अनेक वर्षांपासून फिट या बिमारीचा त्रास होता. त्यामुळे तो मानसिकरित्या चिंताग्रस्त होता. त्यामुळे सततच्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दि 18 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी हिवरखेड येथील स्मशानभूमी रोडवर निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदनासाठी (उत्तरीय तपासणीसाठी) तेल्हारा येथे पाठविले आहे. अरुण हा अत्यंत सु-स्वभावी आणि आपल्या कामाप्रती तत्पर असल्याने गावातील नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांचा तो आवडता कामगार होता. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button