क्राईममहाराष्ट्र

सव्वा लाखाच्या मद्यसाठ्यासह चारचाकी जप्त

जळगाव. दीपक माळी.

जामनेर तालुक्यातील पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी ७ वाजता नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कारमधून सव्वा लाखांचा मद्य साठा व साडेसहा लाखांची कार असा पावणेआठ लाखांचा मुद्देमाल पहूर पोलिसांनी जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू केली असल्याने पोलिस दलाच्या वतीने नाकाबंदी सुरू आहे. या दरम्यान पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, कर्मचारी गोपाळ माळी, विनोद पाटील ज्ञानेश्वर ढाकरे व हेमंत सोनवणे यांच्या पथकास एमएच२०/इइ३०९७) छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी संशयास्पद कार आढळली.

पथकाने कार थांबवून चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) याची चौकशी करून कारची तपासणी केली. चालकाचे बोलणे संशयास्पद आढळले. कारमध्ये १ लाख २५ हजार ४३० रूपये किमंतीचा देशी-विदेशी अवैध मद्यसाठा आढळला. या मद्यसाठ्यासह साडेसहा लाखांची कार असा ७ लाख ७५ हजार ४३० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबधित चालकाला अटक करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button