जळगाव ता मध्ये पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
हरिदास इंदोरे जळगाव जामोद गत काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून दिनांक 11 10 2024 च्या रात्री तालुक्यामध्ये पाच महसुल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे सोंगणी केलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जळगाव जामोद तालुक्यामध्ये जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव, पिंपळगाव काळे, या महसूल मंडळामध्ये सार्वधिक पावसाची नोंद झाली दरम्यान हवामान विभागाने आगामी काही दिवस जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जामोद तालुक्यामध्ये 11 ऑक्टोंबर रोजी जोरदार पाऊस झाला. पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली सध्या सोयाबीन सोंगणीचे लगबग सुरू आहे शेतातच सुड्या लावलेल्या आहेत तसेच मका कापणीला आलेला आहे मात्र पावसामुळे सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.



