Uncategorized

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे पोक्सो कायद्या संदर्भात पथनाट्य सादर.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – दिनांक :: 09 / 10/2024 सविस्तर वृत्त असे की, दिनांक 09 / 10 / 2024 रोजी सावता माळी नवदुर्गा महोत्सव महात्मा फुले चौक देवपेठ वाशिम येथे जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या वतीने पोस्को कायद्यासंदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले . या पथनाट्यामध्ये महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार , बालिकांवर होणारे अन्याय अत्याचार, तसेच लहान बालक , बालिका यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार यावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली . जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला अशा प्रकरणांमध्ये काय मदत करतील या उद्देशाने हे पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री.टेकवानी साहेब यांच्या आदेशाने तथा जिल्हा तिसरा प्राधिकरण ,जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम मधील अनेक गणेश मंडळ, नवदुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी पथनाट्याद्वारे कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली . या पथनाट्यामध्ये पोक्सो कायदा काय आहे ? त्याची अंमलबजावणी कशी केली जाते ? लहान मुलांना अत्याचारापासून कसे वाचवले जाते ? यावर जनजागृती करण्यात आली. या जनजागृती मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे विधी स्वयंसेवक जगदीश मानवतकर , प्रभू कांबळे, माधव डोंगरदिवे , मोतीराम खडसे , शितल बनसोड, मेघा दळवी , सुशील भीमजीयानी यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. हे पथनाट्य एडवोकेट श्री.विसपुते साहेब यांच्या दिग्दर्शनात तयार झाले असून एडवोकेट.श्री.शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे . यावेळी पथनाट्य सादर करून उपस्थित महिला आणि पुरुषांना विधी सेवा प्राधिकरणाचे पत्रके वाटण्यात आली. यावेळी बरेच पुरुष आणि स्त्री मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button