प्रा. फुलसींग जाधव यांची गोर बंजारा साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – गोर बंजारा समाजाचे नामवंत सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व लेखक सेवानिवृत्त प्रा. फुलसिंग जाधव यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे.
गोर बंजारा भाषा , साहित्य, कला व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणे, परिसंवाद, चर्चासत्रे, कवी संमेलने, साहित्यिक , सांस्कृतिक, लोक कलांची संमेलने आयोजित करणे, गोर बंजारा साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देणे, गोर बंजारा वाङ्गमयीन कृती प्रकाशित करण्यास आर्थिक सहाय्य करणे इत्यादी उपक्रम गोर बंजारा साहित्य अकादमी मार्फत राबविले जाणार आहेत. प्रा. जाधव यांच्या निवडीबद्दल राज्यभरातील समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात करण्यात येत आहे.
चौकट
या निवडीबद्दल प्रा. फुलसींग जाधव म्हणाले की, जबाबदारी मोठी आहे. सर्वांच्या सहकार्यांने मिळालेल्या संधीचे सोने करेल. आणि गोर बंजारा भाषेत संख्यात्मक साहित्य निर्मितीपेक्षा दर्जेदार आणि गुणात्मक साहित्य निर्मितीवर भर देण्यात येईल. नवलेखक व कविंना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल. भाषा, साहित्य कला यांच्या विकासाबरोबरच सामाजिक मूल्य आणि संस्कार वाढीवर ही भर देण्यात येईल.



