विर भगतसिंग नवदुर्ग उत्सव मंडळ येथे लोकप्रिय आमदार अमित झनक यांनी केली आरती

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आठ वाजता
मालेगाव येथील विर भगतसिंग नवदुर्ग उत्सव मंडळ येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र मध्ये दुर्गा मातेची स्थापना विर भगतसिंग नवदुर्ग मंडळाने केली आहे. यामध्ये नऊ दिवस दररोज सकाळ व संध्याकाळी पूजा व आरती घेताना मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. या मध्ये मालेगाव रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते आरती घेत असताना पूजे साठी विर
भगतसिंग नवदुर्ग मंडळातील सर्व पदाधिकारी आणि आमदार झनक याच्या सोबत आलेले त्याचे पद अधीकारी डॉ,निलेश मानधणे,प्रवीण पाटील ,सागर जगताप, भारत गुदडे, सेतू संचालक अक्षय पखाले,माजी नगर सेवक शशिकांत टनमाने, राहुल पडघान, अभिषेक देवकते, राऊत,इरळा उप सरपंच महादेव वानखेडे , रवी राठोड,परमेश्वर देवकते,व बाकी सर्व इतर गावातील महिला व बालक, बालिका, मोठ्या संख्येने
उपस्थित होती . सर्व गावकरी
मंडळी या पूजेचा लाभ घेऊन नवरात्र मध्ये विर भगतसिंग नवदुर्ग मंडळ सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम दांडिया खेळतात . काही श्रद्धावान महिला नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास धरून अशा प्रकारे हा नवरात्र उत्सव साजरा करतात.



