Uncategorized

डोंगकिन्ही येथे गतिरोधक करिता शालेय विद्यार्थ्यांसह गावकर्‍याचे रास्ता रोको

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – आज दिनांक ०८/१०/२०२० रोजी डोंगकिन्ही येथे गतिरोधक करिता शालेय विद्यार्थ्यांसह गावकर्‍यानी रास्ता रोको अंदोलन केले
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, डोंगरकिन्ही येथून मालेगाव- मेहकर हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या वरून धावणा-या वाहनांचा वेग हा खुपच असतो आणि हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडे जि.प. प्रा. शाळा असल्याने येथे नेहमीच अपघात होतात या संदर्भात बरेच निवेदने संबंधित अधिकार्‍यांना दिलेले असता व त्यांनी मागितलेले कालावधी देवुन सुद्धा त्यांनी केवळ आश्वासने देऊन कसलीच कार्यवाही केली नसल्याने गावकरी शेवटी शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या समन्वयाने मालेगाव -मेहकर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी वाहणे अडवून रस्ता रोको आंदोलन केले
या अंदोलनात येथील जि.प.शाळेतील विध्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेमानंद गवई, दादाराव गवई, गजानन कोते, लखन राठोड, सरपंच वसंतराव आडे, पोलिस पाटील प्रविण देवकर,
व प्रतिष्ठीत नागरीक हेमंत देशमुख, रविंद्र सुर्यवंशी, अरूण गवई,अगंद देशमुख, निलेश गवई,गणेश गवई, आशिष गवई, सतिष गवई, सुरेश कंकाळ,
बबन तायडे, परमेश्वर गवई, बंडु जाधव, संदिप गवई व गावातील इतर गावक-यांनी देखील या अंदोलनात सहभागी होऊन सहकार्य केले. हे अंदोलन मालेगांव पोलिस उपनिरीक्षक पेटकर साहेबांच्या मध्यस्थीने तात्पुरते मागे घेण्यात आले जर १०/१०/२०२४ ला गतिरोधक बनविण्यात आले नाहीत तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे अंदोलन होईल असा ईशाराही सर्व अंदोलकांडुन देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button