Uncategorized

मेडशी ते मालेगाव रोड वर खड्डयांचे साम्राज्यमेडशीच्या बाहेरून बायपास चालू झाला तेव्हापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या रोडवर केले दुर्लक्ष

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मेडशी ते मालेगाव
मार्गावरील रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या दरम्यान दररोज किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असले तरी; मोठा अपघात होऊन त्यात जिवित हाणी होण्याची शक्यता वाढली आहे. असल्याने हे खड्डे ताबडतोब बुजवून रस्ता चांगला करा अशी मागणी वाहन धारक करीत आहेत.
दरम्यान, पंधरा दिवस अगोदर टू व्हीलर खड्ड्यामध्ये आदळून महिलेचा पडली असता डोक्याला मार लागला असल्याने महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू ते खड्ड्यामुळे झाला असे बोलले जात आहे
. त्यामुळे हे खड्डे बुजवीने अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यावरचे खड्डे रात्रीच्या वेळी अगदी जवळ जाई पर्यंत दिसत नाहीत. आणि मग एकदम ब्रेक दाबून अपघात होतात. असे वाहन धारक बोलत आहेत. तेव्हा संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन एखादा मोठा अपघात होण्यापुर्वी खड्डे बुजवून रस्ता चांगला करावा अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button