आंतरराज्य दरोडे टोळीचा म्होरक्या शिरपूर पोलीसांकडून जेरबंद

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – पोलिस स्टेशन अनसींग जिल्हा वाशिम येथील दरोडा मधील फरार आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या खूनासह दरोड्यातील पोलिसांना पाहिजे असलेला मुख्य आरोपी जेरू परात्या भोसले राहणार बाभुळगाव जिल्हा – हिंगोली यास ग्राम – बरटाळा जिल्हा – बुलडाणा येथुन गोपनीय माहिती वरून आणि तांत्रीक पद्धतीने तपास करून आरोपी शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीचा मराठवाड्यातील लातूर पोलिसांचे पथके सुद्धा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोध घेत होते. सदर आरोपीस पोलीस स्टेशन अनसींग यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार अमर चोरे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन शिरपूर चे ठाणेदार रामेश्र्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस उप निरिक्षक रवींद्र टाले,पोलीस अंमलदार समीर पठाण, शरद कांबळे सर्व पोलीस स्टेशन शिरपूर यांनी केली आहे.
सदर आरोपीच्या टोळीने वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अनसींग हद्दीतील ग्राम- देगाव शेत शिवारातील विमलबाई ज्ञानदेव चौधरी व ज्ञानदेव सोनाजी चौधरी यांचे घरावर दिनांक – 05/08/24 ते 06/08/24 चे रात्री 01:00 वाजता दरम्यान दरोडा टाकण्यासाठी घरात शिरले असता विमलबाई ओरडल्या असता त्यांचे तोंड दाबून त्यांचे पती ज्ञानदेव यांना मारहाण करून वयस्कर दाम्पंत्या जवळील व अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रूपये असा एकूण 1,74,000/- रुपयाचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे ठाणेदार शिरपूर यांनी घटनेचा सखोल अभ्यास करून आधुनिक पद्धतीने व गोपनीय माहिती च्या आधारे टीम पाठवून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना बुलडाणा जिल्ह्यातून पकडले आहे. या कारवाई बद्दल वाशीम पोलिस अधीक्षक यांनी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्र्वर चव्हाण यांचे व त्यांच्या टीमचे विशेष कामगीरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. तसेच देगाव येथील लोकांनी सुद्धा पोलीसांचे कौतुक केले आहे.



