Uncategorized

दोन भावांचा मृत्यू शॉक लागून मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील घटना घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेची स्थापना झाल्यानंतर फेंसिंग करत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दोघा भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड गावामध्ये घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत डोलारखेड येथे चैतन्य नवदुर्गा उत्सव मंडळा तर्फे नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर रोजी स्थापने पश्चात आरती झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गोवर्धन संतोष देठे (२१) त्याचा चुलत भाऊ शुमम गजानन देठे (२२) व मंडळातील ४ ते ५ कार्यकर्ते हे लोखंडाचे फेन्सिंग करीत असताना त्यात

अचानक वीजप्रवाह सुरू झाला. वीज प्रवाहाचा धक्का शुभम व गोवर्धन यांच्या सह चार ते पाच कार्यकर्त्यांना बसला. यामध्ये शुभम देठे व गोवर्धन देठे यांची प्रकृती गंभीर झाली. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी दोघांना तातडीने उपचारासाठी खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ४ ऑक्टोबर रोजी येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करून नंतर दोघा भावांचे प्रेत त्यांचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांवर डोलारखेड येथील अंत्यसंस्कार करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button