Uncategorized
सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, घोषणा होताच राज्यभरात खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खाद्या तेलाच्या दरात प्रति किलो 22 ते 28 रुपयांची वाढ झाल्याच समोरं आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे. एकीकडे सरकारने आता च सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर वर आयात शुल्क ही 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, यानंतर दुसरीकडं खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.



