मुक्ताईनगर येथे कोळी बांधवांच्या ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा….

मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालय आवारामध्ये एस टी प्रमाणपत्र त्वरित वितरण करावे यासाठी गेल्या 18 दिवसापासून कोळी बांधवांचा ठिय्या आंदोलन चालू आहे.सदर आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन कोळी समाजाला एस टी प्रमाणपत्र वितरित करावे. यासाठी काँग्रेस तर्फे आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील व मुक्ताईनगर तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्ते नितीन भाऊ कांडेलकर,जितेंद्र कोळी,संजय भाऊ कोळी, सुधाकर ठाकरे सरपंच पंचाणे, रतिराम महाराज कोळी,सुकलाल भाऊ सांगळकर व समाज बांधव उपस्थित होते ह्या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एससी सेल बी डी गवई साहेब,मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेसचे प्रमुख राजेंद्र जाधव,तालुका उपाध्यक्ष नामदेवराव भोई, तालुका सरचिटणीस अनंतराव देशमुख,तालुका पदाधिकारी बाळू कांडेलकर,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, तालुका पदाधिकारी अमोल पाटील,ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख निखिल चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.



