Uncategorized
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने शरद देशमुख यांचा गौरव

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिम येथे कार्यरत उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अमरावती विभगाचे शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक, शिक्षण आयुक्त सूरज मांडरे, प्रधान सचिव आय. ए. कुंदन, राज्य प्रकल्प संचालक आर. विमला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शरद देशमुख यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. शरद देशमुख यांनी गेल्या पंचेवीस वर्षांच्या कालावधीत श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशीम येथील शाळेत विविध नावीन्यपूर्ण ऑनलाईन व ऑफलाईन असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक यांनी कार्याचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. शरद देशमुख यांनी महाराष्ट्र शासन व एनसीईआरटी यांनी राबविलेले अनेक शैक्षणिक उपक्रम ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
“मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अमरावती विभगाचे शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक, शिक्षण आयुक्त सूरज मांडरे, प्रधान सचिव आय. ए. कुंदन,यांचे उपस्थितीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते, पुरस्कार स्वीकारताना शरद देशमुख सोबत सौ. भारती देशमुख”



