जळगावा जिल्हाबुलढाणा

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी संत चोखोबा जन्मोत्सवाला दिली भेट.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

गजानन खिल्लारे. (ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा) विद्रोही संत चोखामेळा यांनी समाजातील लोकांसाठी देवासमोर समानतेची मागणी केली. अशा या संतांचे विचार साहित्य हे सर्वांना आत्मसात करता आले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने पार्टी संशोधन केंद्राच्या धर्तीवर संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी मेहुना राजा ला बार्टी संशोधन उपकेंद्र सुरू करण्यात यावे असे विचार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा संत चोखामेळा जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक हर्षवर्धन सपकाळ यांनी संत चोखामेळा यांच्या 758 व्या जयंती उत्सव सोहळ्याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. तर प्रमुख अतिथी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, संत चोखामेळा अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माझी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव नागरे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रकाश गीते, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेभराड, दिलीप कुमार झोटे, रिपाईचे भाई दिलीप खरात, काँग्रेस नेते रमेश कायंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे, गजानन पवार, राजेश इंगळे, अशोक पडघान, प्रवीण गीते, गजानन काकड, सुनील शेजुळकर, दीपक चेके, दिलीप सानप, सरपंच मंदा बोंद्रे, विष्णू झोरे, समाधान पाबळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की विद्रोही संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा हा पंढरपूर येथे साजरा करावा. संत चोखामेळा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासून मनात खंत होती पण आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला असल्याचे आनंद व्यक्त केला. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संतांनी कधीच जात धर्म पंथ पाहिले नाही. त्यांनी संतांचे विचार हे मानव जातीला समृद्ध करणारे होते. आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा जागर करून एकत्र नांदावे असे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर संत चोखामेळा साहित्याचे गाड प्रा. कमलेश खिल्लारे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले मानव कल्याणासाठी संतांनी आपला आयुष्य वेचलं त्यांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. या जन्मोत्सवासाठी महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक गट विकास अधिकारी मुकेश माहूर यांनी केले तर सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी दादाराव मसुद वाले, व्ही . एस. जाधव यांनी केले तर आभार राष्ट्रवादीचे युवा नेते गजानन काकड यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button