Uncategorized
“शिक्षक दिनाच्या पर्वावर श्री नारायणा प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिसोड तालुक्यातील दापुरी येथील श्री नारायणा प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पर्वावर लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बद्री लोखंडे यांनी शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण याबाबत चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील चिमुकल्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन आदरातीथ्य केले. ✍️



