बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

‘पोलीस’ लाल पाटी लावलेल्या खासगी वाहनांप्रकरणी तक्रार; पुढील कार्यवाहीसाठी सर्व जिल्ह्यांना पत्र

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी अथवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ असा उल्लेख करून वाहनांचा वापर होत असल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाने पुढील उचित कार्यवाहीसाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठविले आहे.

३१ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात अर्जदार श्री. सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचा संदर्भ देण्यात आला आहे. तक्रारीनुसार, राज्यातील काही पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी किंवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ असा उल्लेख करून वाहनांचा वापर करतात. त्यामुळे अशा वाहनांना तपासणीपासून सूट मिळत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीमध्ये अशा वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील कलम १३३(६) तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १७७ अन्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या अनुषंगाने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने तक्रार अर्जाची प्रत पुढील उचित कार्यवाहीसाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविली असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button