क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खामगाव शहरात संशयास्पद फिरणारा इसम पोलिसांच्या ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव

खामगांव शहर पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान तिरंगा चौक परिसरामध्ये चोरी च्या दाखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या एका इसमाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना तिरंगा चौक येथे विकास विठ्ठल पुरी वय 38 रा. बाळापूर फैल, खामगांव सदर हा व्यक्ती संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. तो सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वीच्या अंधारच्या वेळेत सदर व्यक्ती स्वतःची ओळख लपवून फिरत असल्याचे पोलिसांच्या निर्धनक्षणास आले.
त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने चोरी दाखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तिथे फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज सुरेश गवई यांच्या लेखी रिपोर्टवरून कलम 122 महाराष्ट्र पोलीसकायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button