Uncategorized
पुस्तकाची प्रतिकृती व महावाचन चा लोगो काढून बालविकास मंदिर शाळेत महावाचन उत्सव साजरा.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : - मालेगाव येथील तहसील कार्यालयाजवळ बोरगाव रोडवरील श्री वेंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा येथे शासनाद्वारे आयोजित महावाचन उत्सवामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व्हावी म्हणून शाळेमध्ये सुसज्ज असे जवळपास 1100 पुस्तकाचे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय असून वाचनपेढी सुद्धा आहे तसेच वाचन कोपऱ्यामध्ये वृत्तपत्र वेगवेगळी पुस्तके नेहमी ठेवलेले असतात त्यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांचे भाषण कौशल्य व वाचन कौशल्य सुधारावे म्हणून परिपाठावेळी शाळेमध्ये नेहमीच कथाकथन गोष्टी कविता हे नेहमीच विद्यार्थ्यांद्वारे प्रगट केल्या जातात. सदर महावाचन उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



