भारत मातेच्या जयघोषाने खामगाव शहर दणाणलेआ. अँड फुंडकर यांचे नेतृत्वात निघाली भव्य तिरंगा रॅलीस्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

खामगांव :,:- हर घर तिरंगा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज खामगाव शहरात आमदार अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सांस्कृतिक विभाग यांचे आवाहनानुसार खामगांव मतदार संघाचे लाडके आमदार अँड आकाश दादा फुंडकर यांचे नेतृत्वात व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली आज खामगाव मतदार संघात हर घर तिरंगा या अभिनयाची सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच खामगाव शहरात भव्य तिरंगा srpf चे मेजर अभय राम बुंदेले यांचे स्वागत करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. भारत मातेच्या जयघोषाने खामगाव भाजपाच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅली ने खामगाव शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टडी होऊन निघालेली ही यात्रा भुसावल चौक, लकडगंज, कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकमान्य टिळक पुतळा, नगरपालिका, बस स्थानक, महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, महाराजा मसाला बारादरी, भरत कटपीस, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, शहीद भगतसिंग चौक, शाळा क्रमांक ६ मार्गे भारतीय जनता पार्टी टॉवर टॉक खामगाव येथे या तिरंगा रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. या रॅली त भारतीय जनता पार्टी तसेच सामाजिक संघटना , संस्था व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला . खामगाव शहरात निघालेल्या या भव्य दिव्य अशा तिरंगा मोटरसायकल सुमारे 5000 मोटरसायकल देश प्रेमी सहभाग घेऊन आपले देशप्रेम व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी यांच्यासह अनेक सामाजिक संघटना संस्था यांनी या रॅलीत सहभाग घेऊन आपले देश प्रेम व्यक्त केले. हर घर तिरंगा त सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवा असे आवाहन आमदार अँड आकाश फुंडकर यांनी केले . या रेल्वे भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी तसेच आदीं पदाधिकांनीअथक परिश्रम केले. या रॅली मध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक व राष्ट्र भक्त उपस्थित होते.




