Uncategorized

शेगावातही बालकाची – अपहरणानंतर क्रूर हत्या

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

चिखली पाठोपाठ शेगाव येथेही बालकाचे अपहरण करून त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शेगाव हे. तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ ात उडाली आहे.

चिखली तालुक्यातील एका दहावर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले होते. तर २५ जुलै रोजी या भीषण घटनेची शेगावात पुनरावृत्ती झाली. क्रिष्णा राजेश्वर कऱ्हाळे (वय १४ वर्षे) रा. नागझरी, ता. शेगाव हत्या करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. नागझरी येथील १४ वर्षीय क्रिष्णाचे २३ जुलै रोजी अपहरण झाले होते. खाजगी शिकवणी वर्ग आणि शाळेत गेलेला क्रिष्णा घरी परतलाच नाही. घरच्यांनी विचारपूस एक करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पत्ता न लागल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात रीतसर
तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासा दरम्यान गुरुवारी क्रिष्णा राजेश्वर कराळे याचा मृतदेह भास्तन येथील जंगलात आढळून आला. २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी क्रिष्णाला एक संशयित इसम मोटारसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यावरून पोलिसांनी त्या संशयीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या व्यक्तीची पोलिसांनी कडक भाषेत विचारपूस केल्यावर त्याने खरे ते सांगितले. त्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. शेगाव येथील बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीत शिक्षण घेणाऱ्या क्रिष्णाचा मृतदेह पोतडीत टाकलेला आढळला. त्याच्या मृतदेहा शेजारीच त्याची शाळेची बॅग पडलेली असल्याचे आढळून आले आहे. शेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button