क्राईमजळगावा जिल्हा

बीडच्या माजलगाव येथील टोळी कडून मलकापुर शहरात 14 वर्षीय मुलगी आणि तीन शालेय मुलांचे अपहरण; बोरखेडी पोलिसांच्या तत्परतेने अपहरणचा प्रयत्न फसला !

मलकापूर :- शहरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेनं पालक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गांधी चौक परिसरातून 14 वर्षीय मुलगी आणि तीन शालेय मुलांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून या मुलांना पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, बोरखेडी पोलिसांच्या तत्परतेमुळे ही कार थांबवण्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. अपहरणातून सुटलेली मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असून तिच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

       दरम्यान, प्राथमिक चौकशीत अपहरणप्रयत्नात सहभागी असलेली टोळी तीन जणांची असून ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांकडून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून अपहरणाचा हेतू उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मलकापूर शहर पोलीस व बोरखेडी पोलिसांची संयुक्त पथक कारवाई करत असून, काही वेळेत आरोपींना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आह.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button