Uncategorized

“रिठद विद्युत उपकेंद्रा अंतर्गत आसेगावपेन येथील ३३के.व्हि.विद्युत उपकेंद्र अंधारात, सोयी सुविधाचा अभाव”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आसेगावपेन येथील ३३ के.व्हि. विद्युत उपकेंद्र अंतर्गत अनेक सुविधांचा अभाव असून समस्या अभावी शेतकऱ्यांना गावकऱ्यांना भविष्यात त्रासच होणार आहे. या उपकेंद्रामध्ये जेसीबी खराब झाले असून येवता ये जी फिडर चा ड्रम गेला अनुजा गावठाण फिडरचा ड्रम गेला वनोजा गावठाण चे स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही कोळी फीडरचा स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही.११के.व्हि. इन्कमर स्प्रिंग चार्ज होत नाही. कोणत्याही फिटर वर स्ट्रीपिंग आली असता इनकमर्स स्ट्रीप होत आहे. येशूची वायरिंग जळालेली आहे कंट्रोल रूम मध्ये लाईट नाही. यार्ड मधील सर्व लाईट बंद स्थितीत आहेत.११के.व्ही. इन्कमर कि मास्टर रिले खराब झाला आहे. वनोजा गावठाण चे एबीसीडी नसल्याने डायरेक्ट वायर जोडल्याने अपघात होऊ शकतात तेथे ए.बी. शुज आवश्यक आहे. वनोजा ए.जी. फीडरचे ए.बी.शुज खराब झाले. सध्या कार्यरत असलेल्या ट्रांन्सफाॅर्मरची आ‌ॅईललेवल सुद्धा कमी झालेली आहे ३३ के.व्ही.चे एल.ए. बायपास केलेले आहेत. संपूर्ण व्हि.सि.बी. चे अर्थिंग राॅड व इतर आयसोलेटर बरोबर बसत नाहीत. ११ के.व्ही. चे कंट्रोल पॅनलचे सायरन बंद स्थितीत आहे ११ के.व्ही. कॅपॅसिटर सेल बायपास केलेले आहेत. आणि संपूर्ण व्हि. सी. बी. ची सेटिंग करून देणे गरजेचे आहे. इत्यादी समस्येने ग्रासलेले आसेगावपेनचे ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्रात कोणत्याही ऑपरेटरने नोकरी कशी करावी.ह्या समस्या येणाऱ्या रब्बी हंगामापर्यंत सोडवल्या नाहीत तर शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना विद्युत मिळणे दुर्लक्षित होणार ? वारंवार दुरुस्तीचे प्रॉब्लेम येणार व लाईन बंद राहणार याबाबतच्या तक्रारी संबंधित उपकेंद्राकडून दुरुस्ती विभागाकडे १५ ते १६ वेळा पाठवल्याचे समजते.यार्ड परिसरात गवताची वाढ झाली रात्री-अपरात्री लाईट बंद-चालू करायला जावे लागते.तेथे तणनाशकाची फवारणी करावी लागते. या बाबीची दक्षता रिठद अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता वाशिम, अधीक्षक अभियंता वाशिम यांनी घेणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांना गावकऱ्यांना रब्बी हंगामात वेळेत विज मिळेल.

“याबाबत दुरुस्ती विभागाकडे संपूर्ण माहिती १५ ते १५ वेळा लेखी स्वरूपात दिली असल्याचे रिठदचे प्रभारी कनिष्ठ अभियंता कराळे यांचेकडून शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण आरु यांनी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले.”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button