Uncategorized
तेल्हारा शहरात तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे तेल्हारा ता.प्रतिनीधी
तेल्हारा दि.२० : राठोड तेली समाज पंच मंडळ समिती तेल्हारा जि.अकोला यांचे वतीने
शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी
तेली समाजातील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील एस.एस.सी व एच.एस. सी. परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त श्रेणीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे विशेष आयोजन हे सायं. ०६:०० वाजता भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्याला शैक्षणिक, सामाजिक उपक्रमा अंतर्गत प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तेली समाजातील बंधू-भगीनींनी ऊपस्थीतीत राहून विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह वाढवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राठोड तेली समाज पंच मंडळ, पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य व देखरेख समिती सदस्य, तेल्हारा यांनी केली आहे.




